लोणार सरोवरातील पाण्याचा रंग होतोय लाल; प्रशासनाकडून शोध घेण्याच्या सुचना

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हयातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे बेसाल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. या सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराच्या भोवती अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या सरोवराचे महत्व जास्त आहे. या सरोवराचे पाणी लाला रंगाचे होत असल्याचे परिसरातील … Read more

आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय; श्रीनिवास पाटीलांचे शरद पवारांप्रति गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या … Read more

बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा – पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच तीन महिने देशात कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. देशातील रुग्णसंख्या वाढते आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने ८८ हजारचा आकडा पार केला आहे. मात्र संचारबंदीमुळे सर्वत्र अर्थव्यवस्था ही  कोलमडली आहे. अशा परिस्थितीत आता अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम करावे लागणार आहे. मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना … Read more

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.” भाजपच्या … Read more

‘या’ तारखेला मुंबईत मान्सून होणार दाखल

मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे … Read more

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली … Read more

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही – रोहित पवार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या उत्पन्नातील तब्बल ४५% वाटा असणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे क्षेत्र होय. संचारबंदीच्या आधीपासूनच नोटबंदी, जीएसटी यांच्या तातडीने केलेल्या अंमलबजावणीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना खाजगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून फारसे सहकार्य मिळत नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र संचारबंदीच्या आधीपासूनच अनेक समस्यांचा सामना करते आहे. हे क्षेत्र जवळपास ११ … Read more

सातारा जिल्ह्यात आज १८ नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५९७ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला होता. या पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना … Read more

२४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १२३ मृत्यूंची नोंद 

वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच पण आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत मात्र तेवढेच रुग्ण बरेही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज राज्यात १२३ हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा पाहण्यात आला आहे. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज जाहीर … Read more

MBBS पदवी धारकांना सुवर्णसंधी; ठाणे येथे तातडीची भरती – जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर … Read more