बनावट राशन कार्ड वर नाही मिळणार धान्य, या पद्धतीने व्हाल यादीतून बाहेर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना भाग-२ अंतर्गत सरकार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशांना देखील ५ किलो गहू आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देत आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. देशातील सद्यस्थिती आणि पुढे येणारे सण पाहता ही योजना वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना धान्य पुरविले जाणार आहे. पण … Read more

पाच दिवस, ४६०० किलोमीटर अंतर आणि दोन चालक, श्रीनिवास पाटील यांच्याकडून विशेष कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या संचारबंदीमुळे आंतरराज्यीय वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी दोन चालकांनी चक्क पाच दिवस प्रवास केला. पाच दिवसाचा प्रवास करून ४६०० किलो मीटरचे अंतर कापत पश्चिम बंगालमधील मजुरांना या दोघांनी सुखरूप घरी पोहचवले. सुरेश तुकाराम जगताप आणि  संतोष सुरेश निंबाळकर असे या दोन एस.टी. चालकांचे नाव असून त्यांनी आज … Read more

‘या’ पाच कारणांमुळे पुण्यात पुन्हा १५ दिवसांसाठी लाकडाऊन जाहीर

पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन होईल असे जाहीर केले आहे. याआधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन १२ जुलै रोजी संपतोय. त्यामुळे १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत अजित पवार यांनी आधीच दिले होते. त्यानुसार हा लॉकडाउन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढवण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

औरंगाबाद शहरात कडक संचारबंदी; गल्लीबोळात पोलिसच पोलीस

औरंगाबाद प्रतिनिधी | पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे कडेकोट पालन होताना दिसत असून रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.तर गल्लीबोलात देखील पोलीस पेट्रोलिंग करीत असल्याने शहरात खऱ्या अर्थाने लॉक डाऊन झाल्याचे दिसत आहेत. औरंगाबादेत कोरोनाने कहर केल्यामूळे प्रशासनाने 10 ते 18 जुलै दरम्यान संचारबंदी लागू केली.आज या संचारबंदीचा पहिला दिवस उजाडला आणि रस्तेच नव्हे तर जणू संपूर्ण … Read more

कोरोनाच्या ऍक्टिव्ह प्रकरणांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट; ६२ % लोक बरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होते आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहेच पण त्याबरोबरच एक समाधानकारक बाबही समोर आली आहे. देशातील वाढत्या रुग्णांसोबत देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चांगले दिसून येते आहे. देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६२% इतके आहे. जे कार्यरत रुग्णांच्या प्रमाणात अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार जम्बो भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी … Read more

कोरोना काळातही बिनधास्त पाणीपुरी खाता येणार; आले ATM सारखे पाणीपुरी मशिन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी हा भारतातील सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. भलेही त्याची नावे वेगवेगळी असतील मात्र तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. कित्येक लोक पाणीपुरीचे दिवाने असतात. संचारबंदीच्या काळात या खाद्यपदार्थाची सर्वानी खूप आठवण काढली आहे. सध्या देशातील कोरोना स्थिती आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी यामुळे रस्त्यावरील पदार्थ खाण्यास लोक घाबरत आहेत. पण आता चक्क … Read more

पश्चिम बंगाल मध्ये रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणास परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरात सुरु असणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. उद्योगधंद्यांसोबत मालिका, रिऍलिटी शोच्या चित्रीकरणाला देखील बंदी कऱण्यात आली होती. आता ठिकठिकाणी मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. राज्यांनी आता चित्रीकरणास सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मालिकांचे जुने भाग न लागता नवीन भाग लागणार आहेत. पश्चिम बंगालमध्येही आता रिऍलिटी … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more