म्हणुन रेखाने दिला कोरोना चाचणीसाठी नकार…

मुंबई । सर्व ठिकाणी कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अगदी तो बॉलिवूड कलाकारांच्या घरापर्यंत पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री म्हणून प्रख्यात असणाऱ्या रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. परंतु रेखा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यास नकार दिला आहे. रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण होताच त्यांचा बंगला सील करण्यात आला आहे. … Read more

सोने-चांदी आज 50 हजार रुपयांच्या खाली आले; जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याचा परिणाम आज दिल्ली बुलियन मार्केटमध्येही दिसून आला. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 114 रुपयांची घट झाली आहे, तर चांदी प्रति किलो 140 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घटनेमुळे सोने आज प्रति ग्रॅम 50,000 रुपयांवर आले आहे. काल दिल्ली सराफा बाजारात … Read more

रशियाची ‘ती’ बहुचर्चित लस बाजारात कधी येणार? उत्तर मिळालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशियातील एका विद्यापीठानं करोनावरील पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा केला होता. दरम्यान, ही लस छोट्या प्रमाणात करण्यात आलेल्या मानवी चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून ती माणसांसाठी सुरक्षित असल्याचंदेखील विद्यापीठानं म्हटलं होतं. मॉस्कोच्या सेचेनोव्ह विद्यापीठानं ३८ स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या ही चाचणी केली. त्याचबरोबर, रशियन सैन्यानेदेखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत समांतर … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

सातारा जिल्ह्यात 91 नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या 1 हजार 845 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 88 आणि प्रवास करुन आलेले 3 असे एकूण 91 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील पुनवडी येथील 33, 12, … Read more

टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधला आहे. करोना थांबवण्यासाठी डीजे वाजवून पाहूया का? असा उपरोधिक टोला विशालने लगावला आहे. करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अगदी लॉकडाउनचा … Read more

अभिमानास्पद!!!! डॉक्टर डॉन’ची सुद्धा करोना योद्धयांना मदत!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउनमुळे सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण अनलॉक प्रक्रिया सुरु होताच सरकारने मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली. त्यासाठी काही नियम आखण्यात आले. आता सर्व मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे ‘झी युवा’वरील ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. पडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात करोना … Read more

करण, रणबीर आणि नीतू कपूर यांना करोना झाल्याचे ट्विट व्हायरल, रिधिमाने दिले स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर, नीतू कपूर आणि दिग्दर्शक करण जोहरला करोना झाल्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रणबीरची बहीण रिधिमा कपूरने यावर स्पष्टीकरण दिले आहे. नुकताच … Read more