काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार? माजी मुख्यमंत्री चव्हाण अन् महसूलमंत्र्यांमध्ये कमरा बंद चर्चा

Prithviraj Chavan with Balasaheb Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशात आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कराड येथे कमरे बंद चर्चा झाली. यावेळी या दोघांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचे … Read more

लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींकडून ताब्यात – पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकशाहीच्या सर्व संस्था ताब्यात घेतल्या असून या संस्था त्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसते आहे असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच त्यामुळे घटनेत अभिप्रेत असणारा न्याय लोकांना मिळणार का अशी शंका जनतेमध्ये निर्माण झाल्याचे मत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. … Read more

फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला ; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मला काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली होती. त्यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनादेखील नोटीस आली … Read more

नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी – पृथ्वीराज चव्हाण

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील कल हळूहळू समोर येत आहेत. एनडीए पुढं जात असली तरी जेडीयु पेक्षा भाजपच्या जागा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. याच मुद्द्यावर बोट ठेवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणल … Read more

काँग्रेसची विचारसरणी समाजापर्यंत रुजवणे हाच आमचा अजेंडा – उदयसिंह पाटील उंडाळकर ; पृथ्वीराज चव्हाण-विलासकाका उंडाळकर गट एकत्र

सकलेणं मुलाणी । कराड “संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysingh Patil Undalkar)यांनी दिली. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड तालुक्यात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील काॅग्रेसमधील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि … Read more

मराठा नेत्यांना आरक्षण नको असते तर आम्ही त्यावेळी अध्यादेश पारित केलाचं नसता- पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील काही बड्या नेत्यांना मराठा आरक्षण नको असल्याचे म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांचे मराठा आरक्षणाच्या विधानविषयी गांभीर्यांने घ्यायची गरज नाही, त्याचे ते विधान हास्यास्पद आहे. आमच्यातील मराठा नेत्यांना आरक्षण … Read more

‘या’ परदेशी कंपनीला राज्यात आणा! पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसंच फडणवीस सरकारने घोषणा केलेल्या कंपन्याही परराज्यात गेल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘फडणवीस सरकारने फॉक्सकॉन कंपनी पुण्यात … Read more

तिजोरी रिकामी असताना देखील ६ कारसाठी मान्यता?- देवेंद्र फडणवीस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील निधी हा या आजाराशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतो आहे. असे असताना देखील राज्य शासनाने मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा कार खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून राज्य … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

मोदींना १५ ऑगस्टला मोठी घोषणा करता येण्यासाठीच ‘हा’ आटापिटा आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । कोरोना आजाराला प्रतिरोध करणारी पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला … Read more