उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित झाला आहे. विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरुन महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. महेश मोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी … Read more

राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडू नये; चंद्रकांत पाटील कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री … Read more

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह 65 संचालकांना क्लीन चिट

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra state co cooperative bank scam) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्यासह इतर संचालकांना क्लीन चिट मिळली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांच्या चौकशी … Read more

पुण्यामध्ये 5600 स्वस्त घरांसाठी निघाली लॉटरी, तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचे नाव ‘या’ द्वारे चेक करा

नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले … Read more

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

पुणे, दि.१५ |  खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती … Read more

सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

सारथी बंद होणार नाही! उद्याच ८ कोटींचा निधी दिला जाईल; अजित पवारांची घोषणा

मुंबई । सारथी संस्थेसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसरकारमार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सारथी संदर्भात राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला. “सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार जम्बो भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी … Read more

दुरावलेले उदयनराजे पुन्हा सक्रिय; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले कोरोनाबाबतचे ‘हे’ मुद्दे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध … Read more