तामिळनाडूतील न्यूवेली औष्णिक विद्युत केंद्रामध्ये भीषण स्फोट; अनेकांचे मृत्यू झाल्याची शंका

नवी दिल्ली । तामिळनाडूतील न्यूवेली थर्मल प्लांटच्या स्टेज-2 वरील एका बॉयलरमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. आतापर्यंत 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींवर एनएलसी लिग्नाइट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, न्यूवेली थर्मल प्लांटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्कू ऑपरेशन … Read more

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परिक्षेत ९९.८९% विद्यार्थी अपयशी! आता त्यांचं काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. पण यासोबतच अयशस्वी विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनीही मेहनत केली होती. मात्र त्यांना यशाला मुकावे लागले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात. पण त्यातले सर्वच यशस्वी होत नाहीत. अपयशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाचे निदान 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन … Read more

भारत चीनच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले ते जवान कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या … Read more

म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने केले ठाकरे सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी … Read more

धक्कादायक ! खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्याने सहा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमध्ये नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एका सहा वर्षाच्या मुलाने खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिरुचिरपल्ली येथील एका गावात ही घटना घडली आहे. इथे ठेवलेल्या गावठी स्फोटकाला खाण्याची वस्तू आहे असं समजून मुलाने चुकून ते खाल्लं. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

‘या’ तारखेला मुंबईत मान्सून होणार दाखल

मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे … Read more

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र … Read more

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली … Read more