संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत निर्णय जवळपास झाला; उदय सामंत यांची माहिती

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत … Read more

लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. … Read more

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टला राज्य सरकारची मान्यता

पुणे । महापालिकेच्या माध्यमातून कैलासवासी मा. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. या महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन व्हावे अशी संकल्पना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ते स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मांडली होती. त्यांनी विविध पातळ्यांवर त्याचा पाठपुरावाही केला होता. आता या संकल्पनेला राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ … Read more

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

या १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होते आहे. काही राज्यांमध्ये संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढतेच आहे. आसाममध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आहे. देशातील एकूण १३ शहरामध्ये ७०% कोरोनाबाधित रुग्ण … Read more

मृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात एक मृत महिला आणि तिच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजय करोल आणि न्यायमूर्ती एस. कुमार यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने या व्हिडीओचे वेदनादायक असे वर्णन केले आहे. खंडपीठाने सांगितले की, ‘ही धक्कादायक बातमीही … Read more

गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या; अशोक चव्हाणांची रुग्णालयातून मागणी

मुंबई |  काँग्रेस पक्षाने मजूर तसेच गरीब यांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारला घेरण्याचा क्रम सरकारने सुरु केला आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेसमधील नेत्यांनी व्हिडिओद्वारे आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाला बाली पडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनीदेखील या … Read more