आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

घरी बसून ‘अशी’ करा आषाढी वारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक उत्सव म्हणजे वारी होय. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठुरायाचे भक्त त्याच्या भेटीच्या ओढीने त्याला भेटायला पायी जातात. कोणताच भेदभाव न ठेवता समानतेचे, एकतेचे आणि बंधुतेचे सूत्र जपत एकमेकांना सहकार्य करत भाविक आपल्या माऊलीला भेटायला जात असतात. गेली अनेक वर्षे ही वारीची परंपरा सुरु असल्याचे सांगितले जाते. १३ व्या … Read more

वारीतील मानाच्या सात पालख्यांबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव सोहळा म्हणून पंढरीची वारी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टाळ मृदूंगाच्या तालावर संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक  पंढरपूरला पायी जातात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पंढरीची ही पायी वारी होणार नाही आहे. सरकारने कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे … Read more

वारीचे सांस्कृतिक महत्व काय? जाणुन घ्या ‘या’ काही विशेष गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची संपन्न परंपरा आहे. संतांचा इतिहास आहे. पंढरपूरच्या विठुरायाला आपला परमेश्वर मानून त्याच्या भेटीच्या ओढीने त्याचे भक्त पायी पंढरपूरला जात असतात. या वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे लहानथोर, उच्च नीच असा काहीच प्रकार पाहायला मिळत नाही. सारेच भजन, कीर्तनात डांग होऊन आपल्या विठुरायाला भेटायला पायी जात असतात. साधारण १३ व्या शतकात सुरु … Read more

सहकारी बँकांशी निगडीत नवीन कायद्याचा तुमच्या खात्यातील पैशांवर काय परिणाम होणार ? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहकारी बँका अद्यापही आरबीआयच्या थेट देखरेखीखाली नव्हत्या, मात्र 24 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता सर्व सहकारी बँका या आरबीआयच्या थेट देखरेखीखाली ठेवल्या जातील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, … Read more

इंदुरीकरांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल; तृप्ती देसाई म्हणतात… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वारंवार आपल्या वादातीत कीर्तनामुळे नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज आता पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्यावर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या कीर्तनातून सातत्याने महिलांचा अपमान करणाऱ्या तसेच पुत्रप्राप्तीचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. यावर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई बोलल्या आहेत.शेवटी … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

वयाच्या १९ व्या वर्षी ‘या’ महिला क्रिकेटपटूने दुहेरी शतक झळकावून रचला इतिहास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधना हिच्या नावावर आज अनेक विक्रम आहेत. २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मंधनाने भारताकडून २ कसोटी, ५१ वनडे आणि ७५ टी -२० सामने खेळलेले आहेत. मंधनाने ५१ एकदिवसीय सामन्यातून २ हजार २५ धावा केल्या असून त्यामध्ये ४ शतके आणि १७ … Read more