दीपिकाचे #दोबारा पूछो अभियान सुरु; हॅशटॅग ट्रेंडींगला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यासंदर्भात अनेक मुद्दे समोर येत आहेत. अनेकांनी मानसिक आरोग्यासंदर्भात बोलायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील मानसिक आरोग्याशी संबंधित एक मोहीम सुरु केली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरून दोबारा पूछो … Read more

पुण्याच्या या पठ्ठ्यानं बनवलाय चक्क सोन्याचा मास्क; किंमत २.९ लाख रुपये

पुणे । सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. आता संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून कामकाजाला सुरुवात केली जात आहे. मात्र हे करत असताना सामाजिक अलगावचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. आता आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार लोक मास्क खरेदी करत आहेत. पण पुण्यात एका इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. पुण्यातील पिंपरी … Read more

JEE, NEET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार परिक्षा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी होती तसेच शाळा महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई, एनईईटी या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई (Joint Entrance Examination) … Read more

कोविड -१९ मुळे वंचित शेतकऱ्यांना घेता येणार कर्जमुक्तीचा लाभ 

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. मात्र संचारबंदीमुळे … Read more

दुरावलेले उदयनराजे पुन्हा सक्रिय; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले कोरोनाबाबतचे ‘हे’ मुद्दे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध … Read more

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपासून होणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा संचारबंदीमुळे शाळा महाविद्यालये उशिरा सुरु होणार आहेत. अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु होण्याची वाट बरेच विद्यार्थी आणि पालक बघत होते. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठीचा … Read more

सोन्याच्या वायदा किंमती रेकॉर्ड स्तरावर; जाणुन घ्या आजचे भाव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भारताच्या सोने बाजारातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.  सुरुवातीच्या व्यापारात भारतात सोन्याचे वायदा दर प्रति १० ग्रॅम ४८,८७१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. अशाप्रकारे २०२० मध्ये सोन्याच्या वायद्याच्या किंमतीमध्ये आतापर्यंत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोन्याच्या वायदा … Read more

लोकं मला विचारुन टीका करत नाहीत; उदयनराजेंचं पडळकर-पवारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयन राजे भोसले यांनी बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी ज्यांनी कुणी कोणावर टीका केली ते त्यांचं त्यांना विचारा माझा काय संबंध? असे उत्तर दिले. माझा यात काय संबंध, मी माझे … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेणयात आला आहे. म्हणूनच १ जुलैपासून पुन्हा ठाणेकरांना संचारबंदीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ … Read more